कोल्हापूर महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण चालू !
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण ४ एप्रिलपासून प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार चालू करण्यात आले. यात ४७ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण झाले. मोहीम शहरात राबवण्यात येणार आहे. सध्या ७ सहस्र ५०० हून अधिक भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आजपर्यंत करण्यात आले आहे.
पशूसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. भटक्या कुत्र्यांविषयी तक्रार करावयाची असल्यास साहाय्यक आरोग्य निरीक्षक यांच्याशी ९५६१८१४४७४ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.