भावना गवळी यांना वार्यावर सोडणार नाही ! – मुख्यमंत्री
अकोला – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४ एप्रिल या दिवशी यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. ‘आम्ही भावना गवळी यांना वार्यावर सोडणार नाही’, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ येथे झालेल्या सभेत केले.
(सौजन्य : ucnnewslive)
अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, अमरावती येथून भाजपच्या उमेदवार सौ. नवनीत राणा, नांदेड येथून प्रतापराव पाटील चिखलीकर, तर हिंगोली येथून बाबूराव कदम पाटील कोहळीकर यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले.