धर्माचरणाची ओढ असलेली ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची जळगाव येथील चि. मोक्षदा अमोल शिंदे (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. मोक्षदा अमोल शिंदे ही या पिढीतील एक आहे !
फाल्गुन कृष्ण एकादशी (५.४.२०२४) या दिवशी मोक्षदा अमोल शिंदे हिचा ४ था वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. मोक्षदा अमोल शिंदे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३०.३.२०२४) |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
चि. मोक्षदा अमोल शिंदे हिला ४ थ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. उत्तम निरीक्षणक्षमता
अ. ‘चि. मोक्षदाचे निरीक्षण पुष्कळ चांगले आहे. तिचे शब्दांचे उच्चार स्पष्ट असतात. आम्ही एखादा चुकीचा शब्द बोललो, तर ती आम्हाला त्याविषयी लगेच सांगते.
आ. कुणाकडून काही चूक झाली, तर ते तिच्या लगेच लक्षात येते आणि ती संबंधितांना त्याची जाणीव करून देते.
२. सहनशीलता
एकदा न्यूमोनिया झाल्यामुळे मोक्षदाला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिथे उपचारासाठी ‘सलाईन’ लावणे इत्यादी करतांना अन्य मुले रडून त्रास देत होती; परंतु मोक्षदा थोडीही रडली नाही आणि तिने त्रासही दिला नाही.
३. धर्माचरणाची ओढ
एकदा मोक्षदा आणि मोक्षदाची मोठी बहीण आनंदी यांना त्यांच्या आजीने कुंकू लावल्यावर आजीला (सौ. आशा शिंदे यांना) विचारले, ‘‘कुंकू का लावायचे ?’’ आजींनी त्यांना त्याविषयी सांगितल्यावर मोक्षदा म्हणाली, ‘‘आई टिकली का लावते? आईनेही कुंकू लावायला पाहिजे आणि आम्हालाही कुंकू लावून दिले पाहिजे.’’
४. आज्ञापालन करणे
मोक्षदाच्या शाळेत ‘घरातील रुग्णाईत व्यक्तींना साहाय्य करा’, असे सांगितले होते. माझ्या सासूबाई (सौ. आशा लक्ष्मण शिंदे) रुग्णाईत असतांना मोक्षदा त्यांना ‘औषध-पाणी घेतले का ?’, ‘काही साहाय्य हवे का ?’, असे विचारत असे.
५. देवाची ओढ
मोक्षदाला शिवपिंडी बनवण्यास पुष्कळ आवडते. ती मातीची किंवा कणकेची शिवपिंडी बनवते. ती घराजवळील साईबाबा मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरते.
६. सेवा आणि सत्संग असतांना कुठलाही त्रास न देणे
अ. नवरात्रीमध्ये श्री एकवीरादेवीच्या मंदिरात मी आणि मोक्षदाचे बाबा प्रदर्शन कक्षावर सेवा करत होतो. तेव्हा मोक्षदा आमच्या समवेत प्रदर्शन कक्षावर आली होती. तिथे ती रात्री उशिरापर्यंत जागायची; पण तिने आम्हाला कसलाही त्रास दिला नाही किंवा तिच्यामुळे आमच्या सेवेत कसलीही अडचण आली नाही.
आ. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव किंवा सद्गुरु स्वाती खाडये यांच्या सत्संगाच्या वेळीही मोक्षदा शांत असते आणि पूर्ण सत्संग शांतपणे ऐकते.
७. भाव
मोक्षदाला ‘‘प.पू. गुरुदेव कोण आहेत ?’’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘सद्गुरु आजोबाच (सद्गुरु नंदकुमार जाधव) प.पू. गुरुदेव आहेत.’’ प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर ती लगेच त्यांना नमस्कार करते.
८. जाणवलेला पालट
८ अ. प्रेमभाव वाढल्याचे जाणवणे : पूर्वी मोक्षदा तिला दिलेला खाऊ कुणालाही देत नसे आणि तिच्या मोठ्या बहिणीला (आनंदीला) दिलेला खाऊही तीच खात असे; परंतु आता ती तिला दिलेला खाऊ इतरांना देते आणि आनंदीसाठी वेगळा राखून ठेवते.
९. स्वभावदोष
राग येणे, हट्टीपणा, हेवा करणे’
– सौ. अवनी अमोल शिंदे (मोक्षदाची आई), जळगाव (७.३.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.