निवडणूक घोषित होताच वैयक्तिक स्वार्थासाठीपक्ष पालटणारे नेते व्यवस्थेला घातक !
निवडणुका घोषित झाल्यानंतर किंवा त्या होणार, असा सुगावा लागल्यावर नियमित घडणारी घटना म्हणजे पक्षांतर. या काळात अनेक जण आपल्या पक्षनिष्ठा पालटतात. पक्षपालट वा पक्षांतर यांवर गेल्या ७६ वर्षांत प्रभावी उपाययोजना झालेली नाही. पक्षांतर रोखण्यासाठी वर्ष १९८६ मध्ये ५२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. प्रत्यक्षात ही घटनादुरुस्ती करण्याआधी, म्हणजे १९५० ते १९८६ या ३६ वर्षांच्या काळात जितकी पक्षांतरे झाली, त्यापेक्षा कितीतरी अधिक पक्षांतरे हा कायदा अस्तित्वात आल्यानंतरच्या वर्षांत घडली. (पक्षांतर कायदा अस्तित्वात आल्यावर पक्षांतरे अधिक निवडणुकीच्या काळातील पक्षांतरे आणि राजकारण प्रमाणात होणे, हे कायद्याची निरर्थकता स्पष्ट करते ! – संपादक)