नाशिक येथे मुसलमानांकडून रस्ता बंद आणि वाहनांची तोडफोड !
धर्मगुरु महंमद पैगंबर यांच्या मुलीविषयी कथित आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण
नाशिक – येथील जय भवानी रस्ता परिसरात रहाणार्या हिंदु तरुण संकेत सौदागर याने मुसलमान समाजाचे सर्वोच्च धर्मगुरु प्रेषित महंमद पैगंबर यांची मुलगी फातेमा बिंत महंमद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह लिखाण असलेली पोस्ट ‘इन्स्टाग्राम’वर प्रसारित केल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. ३ एप्रिलच्या रात्री उशिरापर्यंत मुसलमानांनी रस्ता बंद केला, तसेच वाहनांची तोडफोड केली. सार्वजनिक बसगाड्यांचीही त्यांनी तोडफोड केली. पोलिसांकडून पोस्ट प्रसारित करणार्याला कह्यात घेण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला.
सौजन्य NASHIK NEWS
संपादकीय भूमिकामुसलमानांच्या विरोधात जरा काह ‘खट्’ झाले की, ते कायदा हातात घेतात, तर हिंदू वैध मार्गाने निषेध नोंदवतात. असे असूनही हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हटले जाते, हे संतापजनक ! |