निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने जिल्ह्यात मतदान केंद्र घोषित !
सातारा, ३ एप्रिल (वार्ता.) – निवडणूक आयोगाच्या पूर्वमान्यतेने लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. १ सहस्र ५०० हून अधिक मतदार संख्या झाल्यास कराड, माण आणि कराड दक्षिण मतदारसंघामध्ये तात्पुरती अधिकची मतदान केंद्रे निर्माण करण्यास संमती दर्शवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.