परळी वैजनाथ येथे धर्मांधाकडून विवाहितेवर बलात्कार, जिवे मारण्याची धमकी !
परळी वैजनाथ – ‘फेसबुक’ या समाजिक प्रसारमाध्यमातून अकबर शेख (वय ३२ वर्षे) याने विवाहित महिलेशी ओळख केली. त्याचा अपलाभ घेत महिलेशी शारीरिक संबंध ठेवणे, मारहाण करणे, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीड येथील अकबर शेख याला परळीतील संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.
बीड येथील अकबर याने ‘फेसबुक’च्या माध्यमातून तक्रारदाराशी ओळख निर्माण करून त्याचा अपलाभ घेत महिलेच्या घरी जाऊन बळजोरीने शारीरिक संबंध निर्माण केले. १३ मार्च या दिवशी तक्रारदार महिलेच्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. २ एप्रिल या दिवशी घरामध्ये कुणी नसतांना ‘तू मला कॉल (भ्रमणभाष) का करत नाहीस ? बोलत का नाहीस ?’, असे म्हणून तिच्या पतीला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली, तसेच विनयभंग करत मारहाण केली, असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकाविवाहित महिलांवर अत्याचार करण्यासही मागेपुढे न पहाणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. ‘लव्ह जिहाद सर्वत्र कसा चालू आहे’, यासाठी कुठला वेगळा पुरावा हवा ? |