सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वास्तव्यास असलेल्या खोलीच्या संदर्भात श्री. अशोक भागवत यांना आलेल्या विविध अनुभूती
‘एकदा परात्पर गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या खोलीतील दैवी पालट पहाण्याचे आणि ‘मनाला काय जाणवते’, हे अनुभवण्याचे भाग्य मला गुरुकृपेने लाभले. त्या संदर्भात मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. खोलीतील दैवी पालटाच्या संदर्भात करण्यात आलेले काही प्रयोग
१ अ. खोलीत अनेक दैवी पालट होऊन त्यात चैतन्याची वाढ होणे : सच्चिदानंद परब्रह्म श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या खोलीत अनेक दैवी पालट होऊन प्रचंड प्रमाणात चैतन्याची वाढ झाली आहे. खोलीमध्ये जातांना आणि आत गेल्यावर मला दैवी शीतलता अन् शांतता अनुभवता आली.
१ आ. खोलीतील वातावरण कैलास पर्वतावर असलेल्या दैवी वातावरणाप्रमाणेच जाणवणे : गुरुदेवांचे वास्तव्य असलेल्या खोलीमधील पालट पहातांना गुरुदेवांचे सूक्ष्मातून विराट शिवरूपात दर्शन झाले. एकदा भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या अमृतवाणीद्वारे कैलास पर्वताचा महिमा ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले वास्तव्यास असलेल्या खोलीमध्ये अनुभवलेली दैवी शीतलता आणि शांतता हे सर्व कैलास पर्वतावर असलेल्या दैवी वातावरणाप्रमाणेच होते’, असे गुरुकृपेने लक्षात आले.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले ग्रंथ-निर्मितीची सेवा करत असणार्या पटलावर हात ठेवल्यावर देवता आणि ऋषिमुनी यांचे विराट रूपात दर्शन होणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले ज्या पांढर्या पटलावर दैवी ग्रंथ निर्मितीची सेवा करतात, त्या पटलावर दोन्ही हात ठेवून सूक्ष्मातून काय अनुभवायला मिळते आणि मनाला काय जाणवते’, हे अनुभवण्याचा प्रयत्न करत होतो. त्या वेळी देवी, श्रीविष्णु, दत्तगुरु, ऋषिमुनी आणि अन्य देवतांचे, तसेच भगवान शिवाचे अत्यंत विराट रूपात दर्शन झाले.
१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील लादी कैलासस्वरूप असून त्यातून प्रक्षेपित होणार्या दैवी लहरींतील चैतन्याने विश्वाची सर्व पोकळी व्यापली असल्याचे जाणवणे : खोलीतील लादीपासून हाताचा तळवा वरवर नेतांना तळहाताला ज्या दैवी शीतल लहरी जाणवत होत्या. त्याही कैलास पर्वतावरील लहरींप्रमाणे जाणवत असल्याचे लक्षात आले. त्या दैवी लहरी लादीपासून ७ ते ८ फुटापर्यंत जाणवत होत्या. त्या वेळी मी ७ ते ८ फुटांपेक्षा वर हात नेऊ शकलो नाही. तेव्हा मनात विचार आला, ‘त्या कैलासपर्वत स्वरूप लाद्यांतून प्रक्षेपित होणार्या दैवी लहरींतील चैतन्याने विश्वाची सर्व पोकळी व्यापली आहे.’
– श्री. अशोक शांताराम भागवत, देहली. (२७.२.२०२२)
|