राजेंद्र जोशी यांची भाजप पूर्व मंडल मिरज शहर चिटणीसपदी निवड !
मिरज – येथील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते श्री. राजेंद्र जोशी यांची भाजप पूर्व मंडल मिरज शहर चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र नुकतेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शहरी अन् ग्रामीण भागापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे श्री. जोशी यांनी सांगितले. या प्रसंगी मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष अधिवक्ता सुमेध वासुदेव ठाणेदार, श्री. मोहन वाटवे, माजी महापौर सौ. संगिता खोत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.