अमेरिकेतील मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची आकडेवारी द्या ! – भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार
भारतीय वंशाच्या खासदारांची न्याय विभाग आणि एफ्.बी.आय. यांच्याकडे मागणी
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत अलीकडच्या काळात हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणी भारतीय वंशाच्या ५ अमेरिकी खासदारांनी अमेरिकेचा न्याय विभाग आणि अन्वेषण यंत्रणा ‘एफ्.बी.आय.’कडून या वर्षी घडलेल्या घटनांची माहिती १८ एप्रिलपर्यंत देण्याची मागणी केली आहे.
राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, श्री ठाणेदार, प्रमिला जयपाल आणि अमी बेरा यांनी न्याय विभागाच्या अंतर्गत असणार्या नागरी विभागाच्या क्रिस्टन क्लार्क यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले की, न्यूयॉर्क ते कॅलिफोर्नियापर्यंत हिंदूंच्या मंदिरांवर झालेल्या आक्रमणांमुळे अमेरिकेतील हिंदु समुदाय चिंतेत आहे. या आक्रमणांतील आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे समाजातील लोकही घाबरले आहेत. अमेरिकेतील धार्मिक, वांशिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्यांकांविरुद्धच्या द्वेषाचा सामना करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्याविषयी विभागाची रणनीती काय आहे ? ते आम्हाला कळवावे, अशी आमची विनंती आहे.
अमेरिकेत हिंदूंच्या मंदिरांवर झालेले काही आघात !
१. वर्ष २०२४ च्या आरंभी कॅलिफोर्नियाच्या बे एरियामध्ये असलेल्या ‘शेरावली मंदिरा’वर खलिस्तान समर्थक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
२. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियातील शिव दुर्गा मंदिरातही चोरीची घटना घडली होती.
३. त्याचवेळी कॅलिफोर्नियातील स्वामीनारायण मंदिरावरही आक्रमण झाले होते.
संपादकीय भूमिका
|