वर्ष २०१४ च्या तुलनेत विदर्भात १० लाख ९८ सहस्र मतदार वाढले !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ५ लोकसभा मतदारसंघांमध्ये वर्ष २०१४ च्या तुलनेत १० लाख ९८ सहस्र ६३८ इतके मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच घोषित केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमध्ये हे आढळून आले आहे. वर्ष २०१४ मध्ये या मतदारसंघामधील मतदारांची संख्या ८४ लाख ५६ सहस्र २९ इतकी होती. वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघातील मतदारांची संख्या ९३ लाख ८६ सहस्र ९७० इतकी होती, तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांची संख्या ९५ लाख ५४ सहस्र ६६९ इतकी आहे.