‘जीतो’ कोल्हापूरच्या वतीने ‘अहिंसा रन रॅली’चे यशस्वी आयोजन !
कोल्हापूर – ‘कोल्हापूर चॅप्टर’ अर्थात् ‘जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (‘जीतो’) या सामाजिक स्तरावर मूल्यवर्धन होण्यासाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या वतीने ३१ मार्चला ‘अहिंसा रन रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस मैदानावर पार पडलेल्या या ‘रॅली’साठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अध्यक्ष गिरीष शहा, अनिल पाटील, रमणलाल संघवी, जितेंद्र राठोड यांसह १ सहस्र ८३४ जण यात सहभागी झाले होते. स्वागत गिरीष शहा यांनी केले. ३ गटांत पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले. ‘ॲपल रुग्णालया’च्या वतीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती.