श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड !
आळंदी (जिल्हा पुणे) – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीमधील सर्व विश्वस्तांची मासिक बैठक येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत वर्ष २०२४ च्या आषाढी वारी आळंदी-पंढरपूर पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची निवड करण्यात आली. यानंतर योगी निरंजन नाथ यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अधिवक्ता राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, तसेच मंदिराचे व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
योगी निरंजन नाथ यांची निवड झाल्याविषयी ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. विठ्ठल शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन विशेष अभिनंदन केले आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.