मराठवाडा येथे उष्माघाताचा पहिला मृत्यू !
छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा येथील पैठण तालुक्यातील बिडकिन येथे गणेश कुलकर्णी यांचा ३१ मार्च या दिवशी उष्माघाताने मृत्यू झाला. त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यानंतर त्यांचे नाक आणि तोंड यांतून फेस येऊन त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे म्हणाल्या की, गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालातून निश्चित माहिती मिळेल.