छत्रपती संभाजीनगर येथे तापमानात वाढ होताच प्रतिदिन १०० उष्माघातसदृश रुग्ण !
उन्हात फिरतांना काळजी घेण्याचा आधुनिक वैद्यांचा समुपदेश !
छत्रपती संभाजीनगर – शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअसवर गेल्याने रुग्णालयांमध्ये प्रतिदिन उष्माघातसदृश त्रासाचे रुग्ण येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत ४०, तर खासगी रुग्णालयांमध्ये ५० रुग्ण भरती होत आहेत. चक्कर, मळमळ, उलटी, डोके दुखणे असा त्रास होत असल्याच्या तक्रारी रुग्ण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरतांना काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आरोग्य विभागासह खासगी रुग्णालयांतील आधुनिक वैद्यांनी केले आहे. ‘शहरातील महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांत दिवसभर ४० रुग्ण उपचारासाठी येतात’, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांनी दिली.