महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात ७ सहस्र ४६३ कोटींचा कर जमा !
पुणे – महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात मिळकतकर, बांधकाम शुल्क, पाणीपट्टी आणि जी.एस्.टी. यांच्या माध्यमातून २८ मार्चपर्यंत ७ सहस्र ४६३ कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सलग ३ दिवस शासकीय सुट्या आल्याने २८ मार्च या एका दिवसात १८ कोटी १० लाख ३२ सहस्र ६७२ रुपये मिळकत कर जमा झाला आहे. बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.