तरुण कसा असावा ?
१. तरुण : ‘सुख किंवा दुःख यांत ज्याची ध्येयनिष्ठा अभंग रहाते तो ‘तरुण’ आणि त्याचेच नाव ‘तपस्विता.’
२. तरुणाचे वैशिष्ट्य : तत्परता असेल, तरच तो तरुण !
३. मुले तरुण रहाण्यासाठी त्यांना ‘अध्यात्म ज्ञान’ सांगणारी गीता शिकवली पाहिजे ! : ‘अध्यात्म ज्ञान हेच खरे ज्ञान होय. इतर सर्व अज्ञान !’, हे स्पष्टपणे केवळ गीताच सांगू शकते. कृष्ण भगवंताने गीतेच्या रूपाने आमच्या जीवनात काही वेगळा आनंद निर्माण केलेला आहे. जीवनात अशा प्रकारचे ज्ञान असायला हवे. ‘प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांना, अशा प्रकारचे ज्ञान द्यायला हवे’, असा कृष्ण भगवंताचा आग्रह आहे, तरच मुले तरुण रहातील.’
(साभार: ‘तरुण’ – सद्विचार दर्शन)