आनंदी, प्रेमळ आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
१. प्रेमभाव
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका फार प्रेमळ आहेत. ते लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच आपलेसे वाटतात. त्यांचा प्रेमळपणा पाहून मला परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येते. ‘सद्गुरु गाडगीळकाका ही प.पू. गुरुदेवांची प्रतिकृतीच आहेत’, असे मला वाटते.
२. सद्गुरु गाडगीळकाकांचा चेहरा फार तेजस्वी दिसतो. ‘त्यांच्याकडून प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते.
३. ते एखाद्या बालकाप्रमाणे निरागस आणि आनंदी आहेत.
४. साधकांचे त्रास दूर करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणे
सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत. सद्गुरु काका स्वतः विश्रांती न घेता सतत सेवा करत असतात. त्यांना केव्हाही नामजपादी उपाय विचारले, तरी ते न कंटाळता तत्परतेने उपाय सांगतात. आपण सद्गुरु गाडगीळकाकांना होणार्या त्रासांच्या संदर्भात विचारल्यावर काही क्षणांतच ते उपाय शोधतात आणि त्यानुसार जप, मुद्रा अन् जपाचा कालावधी कळवतात. प्रसंगी ते स्वतः साधकांसाठी नामजपादी उपाय करतात. ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.
‘सद्गुरु गाडगीळकाकांना उदंड आयुष्य मिळो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’
– सोै. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२२)
|