सप्तश्रृंगी गडावर भाविकांना जाण्यासाठी इलेक्ट्रिकल बस उपलब्ध !
नाशिक – चैत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वणी येथील सप्तश्रृंगी गडावर येत असतात. या भाविकांच्या वाहतुकीसाठी एस्.टी. महामंडळाच्या वतीने नियमित बसगाड्यांसमवेतच इलेक्ट्रिकल बसगाड्यांची सुविधा १ एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक ते सप्तश्रृंगी या मार्गावर इलेक्ट्रिकल बससाठी १७० रुपये प्रतिप्रवासी भाडे असणार आहे. या मार्गावर एकूण १२ फेर्या असतील. सकाळी ५ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत जुने सी.बी.एस्. बसस्थानक येथून या गाड्या सुटतील.