अहिल्यानगर येथील उड्डाणपुलाखालील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांच्या साठ्याचा स्फोट !
अहिल्यानगर – येथे ३० मार्चला उड्डाणपुलाखाली असलेल्या नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांच्या साठ्याचा स्फोट झाला. सदरची घटना समजताच घटनास्थळी कोतवाली पोलिसांनी धाव घेतली. या ठिकाणी नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या कुणी टाकल्या ? हा शस्त्रसाठा कुणाचा आहे ? त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.