युवा-जीवनाचे दायित्व
‘युवावस्था उत्साह, आशा, दृढता आणि ध्येयाप्रती विशेष प्रयत्न घेऊन येते. तिच्यासमवेतच जीवनात विविध प्रकारची दायित्वेही येतात. ‘आपल्या प्राचीन उत्कृष्ट परंपरेसमवेत जुळवून रहाणे आणि आपल्यासाठी परिस्थितीच्या अनुकूल नव्या मार्गावर चालणे’, हे दोन्ही भाव महत्त्वाचे आहेत. ‘चारित्र्य पवित्र असेल, ईश्वरावर विश्वास असेल, पूर्वजांप्रती श्रद्धा असेल आणि भविष्याप्रती आस्था असेल’, तेव्हाच हे भाव सुरक्षित राहू शकतात.’
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, मार्च २०२०)