‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा भाग असल्याने त्रास असलेल्या साधकांना ‘तुमचा त्रास कधी न्यून होणार ?’, असे साधकांनी विचारणे अयोग्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्या कालमहात्म्यानुसार जवळजवळ अनेक व्यक्तींना अनिष्ट शक्तींच्या त्रासामुळे न्यूनाधिक प्रमाणात कष्ट होत आहेत. सनातनच्या काही साधकांना तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होतो. त्यांना अन्य साधकांनी ‘तुमचा त्रास कधी न्यून होणार ?’, असे विचारू नये; कारण त्यांना त्याचे उत्तर ठाऊक नसते. ‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा एक भाग असून प्रारब्धात जसे असेल, तसेच घडत असते. साधनेमुळे साधकांच्या प्रारब्धाची तीव्रता न्यून होऊ लागली की, त्यांच्या आध्यात्मिक त्रासातही हळूहळू घट होऊ लागेल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.