लग्नाला नकार दिल्याने मुंबईत धर्मांधाचे युवतीवर आक्रमण !
मुंबई – लग्नाला नकार दिला; म्हणून महंमद हारून इद्रीस (वय २५ वर्षे) याने ३० वर्षीय युवतीवर आक्रमण केले. मालाड (पूर्व) येथे ३० मार्च या दिवशी हा प्रकार घडला. या आक्रमणात युवती गंभीर घायाळ झाली असून तिच्यावर शताब्दी रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. पीडित युवती एका खासगी संगणक शिकवणी वर्गात शिकवते. महंमद अनेक दिवसांपासून युवतीच्या मागावर होता. तो वारंवार तिला लग्नासाठी विचारणा करत होता. शिकवणी वर्गाला जात असतांना त्याने युवतीवर लोखंडी सळीने आक्रमण केले. या प्रकरणी त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|