केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी !
नवी देहली – मद्य धोरण प्रकरणात २१ मार्चपासून कारागृहात असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ‘ईडी’ची कोठडी संपली असून त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. १ एप्रिल या दिवशी येथील राऊस व्हेन्यू न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी केजरीवाल यांना उपस्थित करण्यात आले. या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिला. २१ मार्च या दिवशी अटक झाल्यानंतर २२ ते २८ मार्च या कालावधीत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. केजरीवाल यांनी कारागृहात वाचनासाठी श्रीमद्भगवदगीता आणि रामायण या ग्रंथांसह आणि ‘हाऊ प्रायमिनिस्टर्स डिसाईड’ हे पुस्तक मागितले आहे.
सौजन्य Zee News
अन्य एका प्रकरणात केजरीवाल यांच्या विरोधात सुरजित सिंह यादव यांनी एक जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. याद्वारे केजरीवाल यांच्या कारागृहातून सरकारी आदेश देण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.