प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

१. लागवडीत भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर जाणवलेले पालट

श्री. घनश्‍याम गावडे

१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर फळे येत नसलेल्या झाडालाही फळे येणे : ‘लागवडीत एक जुने आवळ्याचे झाड आहे. त्याला फळे येत नव्हती. भगवंताच्या कृपेने माझ्या मनात ‘त्या झाडाजवळ भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवूया’, असा विचार आला.’ त्या झाडाजवळ भजने लावणे चालू केल्यावर एक ते दीड मासाने एका साधकाने मला सांगितले, ‘‘त्या झाडाला फळे आली आहेत.’’ मी तेथे जाऊन पाहिल्यावर मला जाणवले, ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील चैतन्यामुळे झाडाला फळे आली आहेत.’

१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर प्राणी न येणे : आवळ्याच्या झाडाच्या बाजूलाच काही फळभाज्यांची लागवड केली आहे. ‘तेथे रात्री कोणता तरी प्राणी येऊन काही फळभाज्या खातो’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा तेथेही रात्री भ्रमणभाषवर भजने लावून ठेवणे चालू केले. त्यामुळे आता प्राणी येत नाही.’

भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्याने साधकाला आलेल्या अनुभूती

१. मला शारीरिक त्रास होत असतांना ‘मी देवाची सेवा करत आहे. देव बघून घेईल’, असा भाव ठेवतो. त्यामुळे ‘मला शारीरिक त्रास होत आहे’, याची जाणीव होत नाही.

२. मला सकाळी उठल्यावर सर्व शरीर दुखणे आणि आखडणे, असे त्रास होतात. ‘मी शेतात दिवसभर सेवा करतांना त्रास न्यून होतो’, असे मला जाणवते. ‘सत्मध्ये राहिल्याने आणि देवाची सेवा करत असल्याने त्रास उणावत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

मला हे सर्व अनुभवायला दिल्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. घनश्याम गावडे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक