बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या कथ्थक नृत्य शिकवणार्या संस्थेतील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दैवी युवा विद्यार्थिनी कु. गौरी जथे !
‘४.१२.२०२३ या दिवशी बोरिवली, मुंबई येथील ‘नृत्यनिर्झर’ या नृत्य शिकवणार्या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने कलांविषयीचे संशोधन कसे केले जाते ?’, हे सांगण्याच्या दृष्टीने एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि सौ. शैला घाग उपस्थित होत्या. सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी उपस्थित सर्वांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची ओळख करून दिली आणि संगीत विभागाच्या कार्याविषयी माहिती दिली. त्या वेळी नृत्यनिर्झर संस्थेच्या संचालिका कथ्थक नृत्यालंकार सौ. मनीषा पात्रीकर आणि नृत्य वर्गातील काही विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या सत्संगाच्या वेळी सौ. पात्रीकर यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन कार्यात सहभाग घेतांना, तसेच तेथे नृत्याची प्रस्तुती करतांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्यानंतर सौ. सावित्री इचलकरंजीकर यांनी ‘दैवी बालकांची गुणवैशिष्ट्ये आणि आध्यात्मिक पातळी’, यांचे विश्लेषण केले. त्यांनी नृत्यवर्गात नृत्य शिकणार्या कु. गौरी जथे या दैवी युवा विद्यार्थिनी असून त्यांची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के असल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. हे ऐकून उपस्थित सर्वांना पुष्कळ आनंद वाटला. कु. गौरी आणि सौ. मनीषा पात्रीकर यांना पुष्कळ कृतज्ञता वाटली.
या वेळी कु. गौरी स्थिर होत्या. त्यांच्या चेहर्यावर आनंदी भाव होते. सौ. मीरा जथे (गौरी यांची आई) यांना भ्रमणभाष करून ही आनंदवार्ता सांगण्यात आली. सौ. जथे यांना गौरी यांच्याविषयी ऐकून पुष्कळ आनंद झाला. त्यांनी ‘सौ. मनीषा पात्रीकर गौरीला नृत्यगुरु म्हणून लाभल्या’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तेथे उपस्थित सर्वांनी विषय पूर्ण समजून घेतला. सर्वांनीच गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट देण्याची, तसेच या संशोधन कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
संकलक : सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासक), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. |
कु. गौरी जथे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. मीरा जथे (गौरी यांची आई)
अ. ‘आमच्या घरात आध्यात्मिक वातावरण आहे. कु. गौरीलाही अध्यात्माची आवड आहे. तिचे वागणे सात्त्विक आहे. तिची आध्यात्मिक साधनाही चालू आहे.
आ. तिचे मन निर्मळ आहे.’
२. सौ. मनीषा पात्रीकर, कथ्थक नृत्यगुरु
अ. ‘माझी गौरीशी तिच्या लहानपणापासून ओळख आहे. मी तिला कधीच चिडून बोलतांना पाहिले नाही. ती नेहमी शांत असते.’
३. कु. गौरी जथे यांच्या मैत्रिणी
अ. ‘गौरीचे बोलणे आणि वागणे पुष्कळ निरागस आहे अन् ‘गौरीने ती निरागसता जपावी’, असे आम्हाला वाटते.
आ. तिच्याशी मोकळेपणाने बोलता येते. आम्हाला तिचा आधार वाटतो. ती नेहमी स्थिर असते.’
४. सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. राम होनप
‘ऑक्टोबर २०२३ मध्ये सौ. मनीषा पात्रीकर यांनी त्यांच्या ४ शिष्यांसह महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी नृत्य संशोधनाच्या अंतर्गत एका प्रयोगाच्या वेळी सौ. मनीषा पात्रीकर आणि त्यांच्या ४ शिष्या नृत्य करत होत्या. तेव्हा माझे लक्ष अधिक करून कु. गौरी जथे करत असलेल्या नृत्याकडे जात होते. ‘त्या भावपूर्ण नृत्य करत आहेत. त्यांचे मन निर्मळ आहे’, असे मला जाणवले. तेव्हा सूक्ष्म परीक्षण करतांना माझ्या मनात पुढील विचार आले, ‘कु. गौरी या दैवी युवा साधिका असून त्या स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आल्या आहेत. त्यांची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २३.१.२०२४)
|