वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ४ जण १ वर्षासाठी हद्दपार !
वैजापूर – वैजापूर तालुक्यातील ४ जणांवर १ वर्षासाठी हद्दपारची कारवाई नुकतीच करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने गुन्हेगारी कृत्ये करणार्या आणि सार्वजनिक शांतता बिघडवणार्या ४ जणांवर ही कडक कारवाई करण्यात आली. (हद्दपारी म्हणजे अन्य ठिकाणी जाऊन गुन्हेगारी करण्याची मोकळीक ! – संपादक) या कारवाईत उपविभाग वैजापूरमधील पोलीस ठाणे वैजापूर, शिऊर, वीरगाव क्षेत्रांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करणार्या व्यक्तींचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. उपविभाग वैजापूरमधील पोलीस ठाणे वैजापूर क्षेत्रामध्ये गुन्हेगारी कृत्य करत सार्वजनिक शांतता बिघडवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्यांत वरील ४ जणांचा समावेश होता. वर्ष २०२३ मध्ये उपविभाग वैजापूरमधील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गुन्हेगारी कृत्ये करणार्या एकूण १४ जणांना १ वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.