दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड !; नागपूर येथे रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या युवकाला अटक…
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला जन्मठेप आणि १ लाख रुपयांचा दंड !
पनवेल – १० वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शैलेंद्र लक्ष्मण सहानी (वय २२ वर्षे) याला पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी जन्मठेप आणि १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च २०१६ मध्ये त्याने तळोजा येथे शेजारी रहाणार्या मुलीला झाशी येथे पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी तिच्या आईने तक्रार प्रविष्ट केली होती.
पनवेल न्यायालयाचा निर्णय !
संपादकीय भूमिका : सर्वच बलात्कारांच्या प्रकरणांतील आरोपींना कठोर शिक्षा द्यायला हवी !
नागपूर येथे रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या युवकाला अटक
नागपूर – धावत्या रिक्शात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणार्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून युवकाला अटक केली.
असुरक्षित नागपूर !
यवतमाळ येथेआगीत १० सहस्र टन कोळशाची जळून राख !
यवतमाळ – येथील जुगलकिशोर अग्रवाल यांच्या एफ.्सी.आय.च्या कोळसा डेपोला अचानक भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग उष्णतेमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. यात १० सहस्र टनाच्या आसपास कोळसा जळून त्याची राख झाली. अग्नीशमन दलाच्या ५ बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यात अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांची हानी झाली.
बोईसर (पालघर) येथे विनापरवाना देशी पिस्तूल बाळगणार्याला अटक !
बोईसर – येथे विनापरवाना देशी पिस्तूल, लोखंडी कोयते बाळगणार्या दीपक पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. या वेळी पोलिसांनी काडतुसेही जप्त केली. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका : कायदा-सुव्यवस्थेचा धाकउरला नसल्याचेच लक्षण !
सांताक्रूझ (मुंबई) येथे ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा शिपाई अटकेत !
मुंबई – सांताक्रूझ येथील शाळेत शिकणार्या ८ वर्षांच्या विद्यार्थिनीवर शिपायाने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी ३९ वर्षीय आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. आरोपीने पीडित मुलीला मारहाणही केली होती.
संपादकीय भूमिका : अशा वासनांध वृत्तीच्या शिपायांना शाळेतून बडतर्फच करायला हवे ! अन्य शालेय प्रशासनानेही आपल्या शाळेत असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सतर्क रहायला हवे !