दहिसर (मुंबई) येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण आणि हत्या करणारे २ मुसलमान अटकेत !

लैंगिक अत्याचार करण्यासाठी अपहरण केल्याची आरोपींची स्वीकृती

मुंबई – दहिसर परिसरातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रमझान महंमद कुद्दूस शेख आणि महंमद आझाद कुद्दूस शेख यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत मुलाच्या आईने पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती.

अन्वेषण करतांना पोलिसांना हा मुलगा नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळला. आडीवली-किरवली गावाच्या हद्दीत असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात या मुलाचा मृतदेह हात-पाय बांधून टाकल्याच्या अवस्थेत आढळून आला होता. लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यावर मुलाने विरोध केल्यामुळे आरोपींनी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला बेशुद्ध केले आणि कपड्याने त्याचा गळा आवळला. (कथित अल्पसंख्य समाजाची विकृत मानसिकता ! – संपदाक) यामध्ये मृत मुलाचा मृत्यू झाला.

संपादकीय भूमिका 

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे मुसलमान !