Karnataka Cow Smuggling : कडब (कर्नाटक) येथे गो तस्करी करणार्या वाहनाच्या धडकेने एका हिंदूचा मृत्यू !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून रस्ता बंद आंदोलन
कडब (कर्नाटक) – राज्यातील उप्पिनंगडी महामार्गावरील मर्दाळ जंक्शन येथे एका चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे विठ्ठल राय या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. धडक दिलेल्या वाहनाचा चालक न थांबता पसार झाला. तिचा शोध घेतल्यानंतर या वाहनातून २ गायींची अवैध तस्करी करण्यात येत असल्याचे उघड झाले. यानंतर स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्ता बंद आंदोलन करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत त्यांनी उशिरापर्यंत आंदोलन चालू ठेवले होते.
Hindu dies after being hit by a vehicle smuggling cows in Karnataka's Kadaba !
Pro-Hindu organizations stage road blockade in protest
It is seen that cow smuggling and cow slaughter have become rampant in the #Congress ruled state.
Will Hindus realise the consequence of… pic.twitter.com/VZfDWS8Bnd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2024
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात गो तस्करी, गोहत्या यांना ऊत आल्याचेच दिसून येत आहे. काँग्रेसला सत्तेवर बसवल्याचा हा परिणाम हिंदूंना लक्षात येईल का ? |