रा.स्व. संघाच्या ३ कार्यकर्त्यांची ७ वर्षांनी निर्दोष मुक्तता !
|
कासारगोडू (केरळ) – येथे वर्ष २०१७ मध्ये रियाझ मौलवी (वय २७ वर्षे) याच्या हत्येच्या प्रकरणी आरोपी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३ कार्यकर्त्यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. अखिलेश (वय ३४ वर्षे ), जितीन (वय २८ वर्षे) आणि अजेश (वय २९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी ७ वर्षे कारावासात घालवली आहेत.
१. कासारगोडूच्या हळेसुर्लू येथील मदरशात शिक्षक म्हणून काम करणार्या महंमद रियाझ मौलवी याची २० मार्च २०१७ च्या सकाळी मशिदीत घुसून सुरा भोसकून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर ३ दिवसांनी वरील आरोपींना अटक करण्यात आली.
२. न्यायालयाच्या निकालावर रियाझ मौलवी याची पत्नी सईदा म्हणाली की, न्यायालयावर आमची श्रद्धा होती. आरोपींना कठोर शिक्षा होईल, असे वाटले होते; परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही.
संपादकीय भूमिकानिपराध असतांना ७ वर्षे कारावासात घालवावी लागण्याला जे उत्तरदायी आहेत, त्यांना शिक्षा का होत नाही ? या निरपराध्यांना यासाठी हानीभरपाई का देण्यात येत नाही ? |