चांगल्या गोष्टींचा उगम न पहाता त्या घ्याव्यात !
संस्कृत सुभाषिते
ॐ विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम् ।
नीचादप्युत्तमां विद्यां स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥
– चाणक्यनीती, अध्याय १, श्लोक १६
अर्थ : अमृत विषामध्ये सापडले, तरी ते घ्यावे. सोने अपवित्र ठिकाणी मिळाले, तरी ते उचलावे. उत्तम विद्या नीच लोकांकडे असली, तरी ती त्यांच्याकडून शिकावी. त्याचप्रमाणे गुणसंपन्न स्त्री हीन कुळातील असली, तरी तिचा स्वीकार करावा. – चाणक्यनीती
श्रद्दधानः शुभां विद्यामाददीतावरादपि ।
अन्यादपि परं धर्मं स्त्रीरत्नं दुष्कुलादपि ॥
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २३८
अर्थ : श्रद्धावान मनुष्याने हीन कुळातील व्यक्तींकडूनही मंगलदायी विद्या शिकावी. इतरांकडून श्रेष्ठ धर्म समजून घ्यावा. गुणसंपन्न स्त्री हीन कुळातील असली, तरी तिचा स्वीकार करावा. – मनुस्मृति