वृद्ध कोण ?
भीष्म वयाच्या १८५ व्या वर्षीही ‘युवा षोडशवर्षवत् ।’ म्हणजे ‘१६ वर्षांच्या तरुणासारखे’ होते. वय वाढल्याने वृद्धत्व येत नाही. चिंता आणि उद्विग्नता यांनी ज्यांच्या जीवनाला स्पर्श केला केलेला नाही, ते वृद्धावस्थेतही तरुण होत. चिंता आणि उद्विग्नता यांनी जे ग्रस्त ते म्हातारे. वृद्ध ही इंग्रजांची कल्पना आहे. ते विचारतात, ‘How old are you?’ उत्तर दिले जाते, ‘Twenty years old.’ म्हणजे हा विशीतही म्हाताराच होय ! जीवनात जो निराश होतो, त्याला ‘म्हातारा’ म्हणतात.
(साभार : ग्रंथ ‘भारतियांचे सांस्कृतिक आदर्श जीवन’ – प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांची प्रवचने)