हिंदु समाज भक्कम करण्यामध्ये सनातन संस्थेचे योगदान पुष्कळ मोठे !
‘मी महाविद्यालयात शिकत असतांना त्या वेळी सनातन संस्थेचे जे सत्संग होत होते, त्यामध्ये जात होतो. मला हे ऐकून पुष्कळ आश्चर्य वाटते की, ज्या संस्थेच्या सत्संगातून नामजपाविषयी ऐकत होतो, त्या संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज सनातन संस्था ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी’ अग्रेसर आहे. समाजातील आणि या देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात असलेल्या सर्व हिंदूंना एकत्रित करून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी सनातन संस्था कार्यरत आहे. त्यासाठी मी सनातन संस्थेचे अंतःकरणापासून आभार मानतो. हिंदु समाज जो काही आज भक्कम झाला आहे, त्यामध्ये सनातन संस्थेचे पुष्कळ मोठे योगदान आहे, एवढेच मी सांगू इच्छितो.’
– श्री. चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू.