गांजामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, तो तुम्ही ओढू नका !
गायक हनी सिंह याचे तरुणांना आवाहन
मुंबई – लोकप्रिय गायक आणि संगीत निर्माता ‘यो यो हनी सिंह’ याने तरुणांना गांजा न ओढण्याविषयी समुपदेशन केले आहे. ‘बहिणी आणि भावांनो, गांजा ओढू नका. गांजामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या व्यसनामुळे माझ्या आयुष्यातील ५ वर्षे वाया गेली आहेत. मद्य किती प्यायचे तेवढे प्या; पण गांजा ओढू नका’, असा समुपदेश हनी सिंह याने चाहत्यांना दिला आहे. (मद्य हेही शरिरास हानीकारक असल्याने ‘ते पिऊ नका’, असा समुपदेश हनी सिंह का देत नाहीत ? केवळ एकांगी सांगून काय उपयोग ? – संपादक)
कौटुंबिक अडचणी आणि गांजा यांमुळे हनी सिंह यांनी संगीत क्षेत्रातून माघार घेतली होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांची पुष्कळ हानी झाली. आता पूर्वीसारखी लोकप्रियता मिळवण्यासाठी ते पुष्कळ कष्ट घेत आहेत.