पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या धर्माधांवर गुन्हा नोंद !
पुणे – १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणार्या समीर शेख उपाख्य सोनू याच्यावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत घडला आहे. मुलगी गरोदर राहिली, हा प्रकार आरोपीला समजल्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची नोंद तक्रारीमध्ये केली आहे.
संपादकीय भूमिका :केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |