बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी डांबलेल्या गोवंशियांना कह्यात घेतले !
नागपूर पोलिसांची कारवाई !
नागपूर – गोवंशियांची बेकायदेशीर कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले गोवंश पोलिसांनी धाडी घालून जप्त केले. या वेळी गोवंशियांचे ८०० किलो मांस, तसेच साहित्य जप्त करण्यात आले आहे, तर ९ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस प्रशासनासह नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्त कारवाई केली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शेख रईस शेख शाबुद्दीन कुरेशी, शेख आरिफ शेख हशम, महंमद साजिद महंमद जाहिदअली, महंमद जावेद महंमद हुसेन, शेख मुस्ताक शेख दावल, शेख आसिफ शेख अख्तर, शेख इमरान शेख ताहीर, महंमद हनीफ महंमद हुसेन आणि शेख कासिम शेख हमीद अशी त्या ९ जणांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका :गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम ! |