Mukhtar Ansari Death : कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या अंत्ययात्रेत ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित !
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. येथील कालीबाग कब्रस्तानात अन्सारी याचा मृतदेह पुरण्यात आला. या वेळी केवळ त्याच्या कुटुंबियांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली होती. त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित होते. गुंड अन्सारी याला राज्यातील बांदा येथील कारागृहात असतांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. अन्सारीला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला असला, तरी शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्याला मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीही करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|