लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ११० उमेदवारांचे अर्ज वैध !
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या उमेदवारी अर्जांच्या पडताळणीमध्ये राज्यातील ५ मतदारसंघांतून एकूण १८१ अर्ज प्राप्त झाले होते. यांतील ११० उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाद्वारे ही माहिती देण्यात आली.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील ५३ पैकी २६, भंडारा-गोंदिया मधील ४० पैकी २२, गडचिरोली (चिमूर)मधील १२ पैकी १२, चंद्रपूरमधील ३५ पैकी १५ आणि रामटेक मतदारसंघातील ४१ पैकी ३५ अर्ज वैध ठरवण्यात आले. पहिल्या टप्प्यातील ५ मतदारसंघाच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ३० मार्च, तर मतदानाचा दिनांक १९ एप्रिल आहे.