पुणे येथे मेट्रो स्थानकांना आस्थापनांची नावे देण्याच्या क्लृप्तीमुळे कोट्यवधींची कमाई !
पुणे – येथे ६ मेट्रो स्थानके आहेत. या स्थानकांच्या नावांमध्ये आस्थापने आणि संस्था यांची नावे जोडून त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याची क्लृप्ती मेट्रोने शोधली आहे. यामुळे प्रत्येक स्थानकातून ५० लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळते. मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही आस्थापने आणि संस्था यांची नावे दर्शनी भागामध्ये विज्ञापनांप्रमाणे देण्यात येतात. प्रवाशांकडून तिकिटावरील उत्पन्नाच्या व्यतिरिक्त मेट्रोचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्ग शोधले आहेत.