Goa Temple Theft : दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली !
गोव्यातील मंदिरे असुरक्षित !
फोंडा, २९ मार्च (वार्ता.) : आडपई-दुर्भाट येथील श्री साई मंदिरातील दानपेटी २८ मार्चच्या रात्री चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याची कडी तोडून पळवली. नंतर ही दानपेटी मंदिराजवळच असलेल्या डोंगरावर निर्जन स्थळी टाकून देण्यात आली. मंदिर व्यवस्थापनाच्या मते चोरट्यांनी फंडपेटीतील सुमारे ५० सहस्र रुपये पळवले आहेत.
(सौजन्य : RDX Goa)
मंदिरामध्ये ‘सीसीटीव्ही’ नाही. चोरट्यांनी दानपेटी डोंगरावर नेऊन फोडली आणि आतील नाणी वगळता सर्व नोटा पळवल्या. मंदिराचे पुजारी त्यांच्या गावी गेल्याने आणि मंदिरात कुणी नसल्याची माहिती चोरट्यांना असल्याने त्यांनी ही चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. २-३ चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचलून नेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फोंडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.