कल्याण येथे वाहतूक पोलीस कार्यालयात धर्मांधाचा पोलिसांना धमकावून गोंधळ !
कल्याण – येथे दुचाकी उचलून नेली म्हणून वाहतूक पोलीस कार्यालयात येऊन धर्मांधाने पोलिसांना शिवीगाळ करून धमकावले, तसेच गोंधळ घातला. धर्मांधाने प्रारंभी पोलिसांना शिव्या दिल्या. त्यानंतर त्याने त्यांची क्षमा मागितली. ‘माझी गाडी मी घेऊन जाणार आहे, पैसे भरू शकत नाही’, अशी धमकी तो पोलिसांना देत होता.
व्हिडिओ सौजन्य: Maharashtra Crime Spot
‘मी २० वेळा ‘सॉरी’ म्हणालो आहे, मला भडकायला लावू नका’, अशी धमकीही तो पोलिसांना देत होता. गाडी तशीच परत नेण्याविषयी तो आग्रही होता. वाहनतळावर मार्किंग (वाहने ठेवायच्या खुणा) का केलेल्या नाहीत ? याविषयीही तो विचारणा करत होता. अन्य पोलीस या घटनेचा व्हिडिओ चित्रीत करत होते, त्याविषयी त्याने आक्षेप घेतला. ‘गाडी नेऊ न देणारा शहाणा पोलीस कुठे आहे ?’ अशी आक्षेपार्ह भाषा तो वापरत होता.
संपादकीय भूमिका
|