पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका धर्मांधाची हॉटेल व्यवस्थापकास मारहाण !
चाकण (जिल्हा पुणे) – सलमान मुलाणी याने चाकण (तालुका खेड) येथील सिताज हॉटेलात जाऊन ‘पोलीस अधिकारी आहे’, असे भासवून हॉटेल व्यवस्थापकाला, ‘माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ करून तिला कामावरून का काढले ? चल आताच्या आता तिचा हिशोब कर आणि लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकीन’, अशी धमकी दिली. तसेच हॉटेल व्यवस्थापकाला शिवीगाळ करून मारहाण केली. हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी त्याचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक)