परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी श्री. कृष्णा आय्या यांचे भावजागृती होण्याविषयी झालेले चिंतन !
२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे श्री. कृष्णा आय्या यांची ‘रथोत्सवाच्या वेळी पटकन भावजागृती का झाली ?’, याविषयी त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘ऐसाची राहे मज दृष्टीपुढे ।’, अशी प्रार्थना केल्यामुळे पटकन भावजागृती होणे
‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला. माझी नेहमीच भावजागृती होते. प्रार्थना, श्लोक, गुरूंचे श्लोक आणि श्रीहरि विष्णूचे श्लोक म्हणतांना माझी भावजागृती होते; पण रथोत्सवात परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रथारूढ झालेले पहाताच माझी भावजागृती झाली. इतर वेळी हळूहळू भावजागृती होते; पण या वेळेला एकदम भावजागृती झाली आणि भावाची स्थिती पुष्कळ वेळ टिकून होती. परात्पर गुरुदेवांचे रूप अजूनही जसेच्या तसे समोर दिसते, याचे कारण ‘ऐसाची राहे मज दृष्टीपुढे ।’, अशी माझ्याकडून प्रार्थना झाली.
‘परात्पर गुरुदेव, आपल्या दर्शनाने जीवनाचे सार्थक झाले. आपल्या चरणी कोटीशः प्रणाम आणि कृतज्ञता !’
– श्री. कृष्णा दत्तात्रय आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |