इस्रायलला पोचले १ सहस्र भारतीय कामगार !
जेरुसलेम – गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर इस्रायलची गाझामध्ये सैनिकी कारवाई चालूच आहे. इस्रायल-हमास युद्धामुळे इस्रायलमधील पॅलेस्टाईनच्या कामगारांना त्यांच्या देशात पाठवण्यात आल्याने इस्रायलला शेती, बांधकाम, स्वच्छता, वृद्धांची सेवा इत्यादी कामांसाठी परदेशातील कामगारांवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतासोबतच्या करारानुसार इस्रायलमध्ये ४२ सहस्र कामगारांना नेण्याचा प्रस्ताव आहे. आतापर्यंत केवळ १ सहस्र भारतीय कामगार इस्रायलला पोचले आहेत, असे इस्रायलच्या स्थलांतरित विभागाने सांगितले.