जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !


नागपूर
– काँग्रेसच्या येथील रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रहित केले आहे. यामुळे त्यांचे उमेदवारी आवेदन बाद होण्याची शक्यता आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

१. ‘रश्मी बर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र काढले होते; पण त्यासाठी त्यांनी वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केले आहे,’ असा त्यांच्यावर आरोप आहे.

२. राज्य सरकारने २२ मार्च या दिवशी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा जात पडताळणी समितीचे अधिकारी गत ३-४ दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते; पण संपर्क होऊ शकला नाही.

३. २८ मार्च या दिवशी सकाळी ९.४५ वाजता जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकार्‍यांनी रश्मी बर्वे यांच्या घराबाहेर एक नोटीस लावली. त्यात त्यांना १० वाजेपर्यंत आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली. त्यानंतरही रश्मी बर्वे समितीपुढे उपस्थित झाल्या नाही. शेवटी प्रमाणपत्र रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपादकीय भूमिका 

खोटे जातप्रमाणपत्र सादर करणारे काँग्रेसचे उमेदवार ! असे उमेदवार निवडून आल्यास खोटेपणा करू शकतात.