Students Thrashed Drunk Teacher : वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना शिवीगाळ करणार्या शिक्षकाला मुलांनी चपलांनी चोपले !
बस्तर (छत्तीसगड) : एक शिक्षक प्रतिदिन शाळेत येऊन मुलांना शिकवण्याऐवजी दारू पिऊन येऊन वर्गात भूमीवर झोपत असे. त्या वेळी विद्यार्थ्यांनी त्याला तास घेण्यासाठी सांगितल्यावर तो मुलांना घाणेरड्या शिव्या देत असे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलांनी शिक्षकाला चपलांनी मारून पळवून लावल्याची घटना येथे घडली.
A viral video has emerged online showing primary school students in #Bastar, #Chhattisgarh, taking matters into their own hands by chasing away a teacher who arrived at school in a drunk state. The incident, captured on camera and shared by social media, shows the kids throwing… pic.twitter.com/zYMD18J9XR
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) March 26, 2024
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाला आहे. पल्लवीभट या गावातील शाळेत ही घटना घडली. या घटनेयाविषयी चौकशी करण्यात यावी, असा आदेश बस्तरचे जिल्हाधिकारी के. विजय दयाराम यांनी गटशिक्षण अधिकार्यांना दिला आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी के. विजय दयाराम यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाअशांची शिक्षक म्हणून भरती कशी होते ? आणि ते वर्गात काय करतात, हे मुख्याध्यापक पहात नाही का ? |