शिमगोत्सवाच्या निमित्ताने भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने दिली मानवंदना !
शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता पाठपुरावा
खेड – भक्तांचे श्रद्धास्थान, नवसाला पावणारी, तसेच माहेरवाशिणीची पाठराखीण असलेल्या तालुक्यातील भरणे येथील श्री काळकाईदेवीला जिल्हा पोलीस दलाने शिमगोत्सवाच्या निमित्ताने शासकीय मानवंदना दिली. या पूर्वी दसर्यालाही श्री काळकाईदेवीला पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली होती. हा मानवंदना सोहळा पहाण्यासाठी मंदिर प्रांगणात भक्तांची गर्दी उसळली होती.
या शासकीय सलामीसाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
श्री देवी काळकाईला शासकीय सलामी देणार्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री काळकाईदेवी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाळे, उपाध्यक्ष सुरेश भुवड, राजेंद्र शिर्के, सचिव प्रशांत चव्हाण यांच्यासह अन्य भाविक उपस्थित होते.