Revenge Porn On Social Media : खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित !
व्हिडिओ प्रसारित करणार्यांना अटक करणार असल्याचे पोलिसांचे सुतोवाच !
(रिव्हेंज पॉर्न म्हणजे प्रेमभंग झाल्यावर सूडाने पेटलेला प्रियकर किंवा प्रेयसी यांच्याकडून आधी एकमेकांसमवेत काढलेली अश्लील छायाचित्रे किंवा व्हिडिओ यांचा गैरवापर करणे किंवा ती अश्लील संकेतस्थळांवर प्रसारित करणे)
खामगाव (जिल्हा बुलढाणा) : येथे मोठ्या प्रमाणात ‘रिव्हेंज पॉर्न’चे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. प्रेमभंग झाल्याने पूर्वाश्रमीच्या जोडीदाराला अद्दल घडवणे, तसेच सूड उगवणे यांसाठी या व्हिडिओंचा वापर केला जातो.
बुलढाणा जिल्ह्यातील पोलिसांच्या ‘सायबर क्राईम सेल’कडे अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून खामगाव पोलीस अशांचा शोध घेत आहेत. असे व्हिडिओ बाळगणे किंवा प्रसारित करणे कायद्याने गुन्हा आहे. हे व्हिडिओ प्रसारित करणार्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाप्रेमभंगामुळे सूड उगवण्याची भावना निर्माण होणे यातूनच नैतिकतेचे अधःपतन झाल्याचे दिसून येते ! अशी पिढी भारताला विनाशाकडे नेल्यास नवल ते काय ? |