भाजपच्या मुख्य प्रचारकांमध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश !
मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने देशभरातील नेत्यांच्या मुख्य (स्टार) ४० प्रचारकांची पहिली सूची घोषित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, सम्राट चौधरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आदींचा समावेश आहे.